Sindhudurg saam tv
Video

Sindhdurg News: धक्कादायक! मदरशात आढळली अवैध हत्यारं, पाहा व्हिडिओ

Shocking! Illegal Weapons Seized from Unauthorized Madrasa: सिंधुदुर्ग दोडामार्ग येथील साटेली-भेडशी भागातील एका अनधिकृत मदरशातून पोलिसांनी अवैध हत्यारे जप्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Omkar Sonawane

सिंधुदुर्ग दोडामार्ग येथील साटेली-भेडशी भागातील एका अनधिकृत मदरशातून पोलिसांनी अवैध हत्यारे जप्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या कारवाईत दोन तलवारींसह दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून, यापैकी एकजण बिहारहून आलेला मुस्लीम धर्मगुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. जो प्रशिक्षण देत होता.

ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी तातडीने तहसीलदारांची भेट घेऊन या अनधिकृत मदरशावर तात्काळ बंदी घालण्याची आणि यासंदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत मदरशात छापा टाकून हत्यारे जप्त केली असून, याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. जिल्ह्यात अशा प्रकारचे मदरसे उभारले जात असल्यास, तेथील सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT