heavy rain saam tv
Video

Beed Rain: बीडच्या आष्टी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, वीज खंडित, जनजीवन विस्कळीत|VIDEO

Natural Calamity Strikes Ashti Taluka: बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले.

Omkar Sonawane

योगेश काशीद, साम टीव्ही

बीड: येथे आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर आष्टी तालुक्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपासून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसाह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे बावी गावातील मिसाळ वस्ती येथे मोठे नुकसान झाले आहे.

वादळामुळे गावातील पंधरा घरांची पत्रे उडून गेली, तर अनेक घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, चिमुकल्यांचे दप्तर आणि शैक्षणिक साहित्य पावसात पूर्णपणे भिजले. या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.तसेच, परिसरातील झाडे आणि वीजेचे पोल उन्मळून पडले आहेत. परिणामी, आष्टी तालुक्यातील जवळपास २५ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे.

या पार्श्वभूमीवर बावी गावाचे सरपंच नवनाथ गर्जे यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. वादळ व पावसामुळे झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर मूल्यांकन करून बाधित नागरिकांना आर्थिक मदत व पुनर्वसनाची कार्यवाही करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT