Showmika Mahadik opposition in Gokul Milk Union general meeting Saam Tv
Video

Gokul Milk: गोकुळ दूधसंघाच्या सभेत राडा; शोमिका महाडिक आक्रमक,पाहा VIDEO

Showmika Mahadik Opposition In Gokul Milk: गोकुळ दूधसंघाच्या 63 व्या सर्वसाधारण सभेत संचालक वाढवण्याच्या ठरावाला शोमिका महाडिक यांनी विरोध केला. सभेत मोठा राडा झाला असून, सभासदांनी अध्यक्ष नावीद मुश्रिफ यांच्या भाषणानंतर मंडप सोडला.

Omkar Sonawane

आज कोल्हापूर येथे गोकुळ दूधसंघाची बैठक पार पडली. या बैठकीत मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीत गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नाविद मुश्रिफ आणि मंत्री हसन मुश्रिफ तसेच इतर नेते उपस्थित होते. ही बैठक सुरू असताना महाडीक गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. गोकुळ दूध संघाच्या सभेत मला अपेक्षित उत्तर मिळतील अशी अपेक्षा होती मात्र ती फोल ठरलेली आहे. सभेमध्ये मनमानी कारभार सुरू आहे. आपला लढा असाच सुरू राहणार असल्याची प्रतिक्रिया संचालिका शौमिका महाडिक यांनी साम टीव्ही सोबत बोलताना दिलेली आहे. गोकुळ दूध संघाची आज 63 वी सर्वसाधारण सभा पार पडत आहे. या सभेसाठी संपूर्ण मंडप सभासदांनी खचाखच भरला होता. मात्र गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांचं भाषण संपताच सभासदांनी सभा मंडपातून काडता पाय घेतला... त्यामुळे सर्व खुर्च्या रिकाम्या पडल्या..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

Maharashtra News Live Update: राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील ३ लाख ५१ हजार शेतकऱ्यांची तिसरी यादी जाहीर

SCROLL FOR NEXT