Moment of explosion caught on CCTV as gas leak leads to a massive cylinder blast inside the house. saam tv
Video

Shocking Video: घरात सिलेंडरमधील गॅस लिकेज, दोघेही लांब पळाले पण...; थरारक व्हिडिओ व्हायरल

Cylinder Blast Destroys Household: घरात गॅस गळतीमुळे झालेल्या भीषण स्फोटाचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रसंगावधान राखत दोन व्यक्तींनी आपला जीव वाचवला.

Omkar Sonawane

एका घरात झालेल्या सिलेंडर स्फोटाचा थरारक व्हिडिओ समोर आला असून, यात दोन व्यक्तींनी प्रसंगावधान राखून आपला जीव वाचवला आहे.

या व्हिडिओमध्ये दिसतं की घराच्या किचनमध्ये सिलेंडरमधून गॅस गळती होत होती. परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित व्यक्तीने तो सिलेंडर हॉलमध्ये आणून ठेवला आणि स्वतःसह दुसऱ्या व्यक्तीने लांब पळ काढला. काही वेळाने गॅसची गळती थांबल्याचे वाटल्याने दोघेही सिलेंडरजवळ गेले. मात्र, त्याच क्षणी अचानक जोरदार स्फोट झाला.

सुदैवाने, दोघांनीही वेळेत पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, या स्फोटामुळे घरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घरातील फर्निचर, भिंती आणि काही वस्तूंना मोठा फटका बसला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही किंवा मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाला असून, नागरिकांनी अशा प्रसंगी अधिक सतर्क राहण्याचे आणि तातडीने अग्निशमन दल किंवा गॅस कंपनीशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT