धोकादायक! शाळकरी मुलीच्या हाती दिली रिक्षा, व्हिडिओ व्हायरल saam tv
Video

जीवाशी खेळ! शाळकरी मुलगी चालवतेय रिक्षा, ड्रायव्हर बाजूलाच, VIDEO व्हायरल

Schoolgirl Drives Auto Rickshaw : शाळेतील अल्पवयीन मुलगी रिक्षा चालवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धक्कादायक म्हणजे या रिक्षात पाठीमागे इतर शाळकरी मुली सुद्धा बसल्या आहेत. हा व्हिडिओ रायगडमधील खोपोलीचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

Nandkumar Joshi

सचिन कदम, खोपोली | साम टीव्ही

भररस्त्यात सुस्साट धावणारी रिक्षा बघा. मागच्या सीटवर तीन ते चार शाळकरी मुली बसल्या आहेत. तर ड्रायव्हरच्या बाजूला एक व्यक्ती बसली आहे. धक्कादायक म्हणजे रिक्षाचं हँडल शाळकरी मुलीकडं दिलं आहे आणि ही मुलगी वाऱ्याच्या वेगानं रिक्षा चालवतेय. बाजूला बसलेला ड्रायव्हर या 'ऑटोचालक' मुलीला इन्स्ट्रक्शन्स देताना ऐकायला मिळत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ रायगड जिल्ह्यातील खोपोली परिसरातील आहे.

शाळकरी मुलगी रिक्षा चालवत असून, पाठीमागच्या सीटवर इतर मुली बसल्या आहेत. धक्कादायक म्हणजे रिक्षा चालवणाऱ्या मुलीच्या बाजूला ड्रायव्हर बसला आहे. तो त्या मुलीला काही सूचना देत आहे. शाळकरी मुलींची वाहनांमधून धोकादायक पद्धतीने वाहतूक करतानाच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. काही व्हिडिओ पण व्हायरल झाले आहेत. त्यावर सरकारनं बंधनंही आणली आहेत. काही ठिकाणी तर कठोर कारवाई देखील केली आहे. तर अनेक कठोर नियम केले आहेत. पण तरीही अशा प्रकारच्या अवैध वाहतुकीला पूर्णपणे आळा बसलेला नाही. त्यात हा खोपोलीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. पोलीस प्रशासन आणि आरटीओ या प्रकाराची दखल गांभीर्यानं घेणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT