Medicine News SaamTv
Video

Pune News : धक्कादायक! सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ, खळबळजनक माहिती आली समोर | VIDEO

Harmful Medicine Supplied To Government Hospital : बीडनंतर आता पुण्यात आणि नांदेडमध्येही मोठ्याप्रमाणात सरकारी रुग्णालयात बोगस औषधांचा पुरवठा झाल्याचं उघड झालं आहे.

Saam Tv

विषारी औषधांच्या विळख्यात सरकारी रुग्णालय अडकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीड नंतर पुणे, नांदेडच्या रुग्णालयात बोगस औषध आढळली आहेत. सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जातो आहे. बीडच्या रुग्णालयात ज्या विशाल डिस्ट्रिब्यूटरकडून बोगस औषधांचा पुरवठा झाला होता, त्याच डिस्ट्रिब्यूटरकडून पुण्याच्या ससुन रुग्णालयात देखील औषधांचा पुरवठा झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नांदेडमध्ये देखील सव्वा लाख बोगस गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या बोगस औषधांची व्याप्ती राज्यात सगळीकडे पसरली असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

विशाल डिस्ट्रिब्यूटरकडून रुग्णालयांना बोगस औषधांचा पुरवठा केला गेला आहे. बीडनंतर पुणे आणि नांदेडमध्ये देखील हा बोगस औषधांचा पुरवठा झाला असल्याचं उघड झालं आहे. बीडच्या डिस्ट्रिब्यूटरकडूनच पुण्याच्या ससुन रुग्णालयात औषधांचा पुरवठा झाला आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचं दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन

World Cancer Day : पुन्हा ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाटतोय? घाबरू नका! डॉक्टरांचा सल्ला वाचा अन् टेन्शन फ्री व्हा

राजकारणात भूकंप! मध्यरात्री भाजपच्या बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा|VIDEO

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Black Dark Skin Care Tips: सावळ्या त्वचेसाठी 5 सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT