विरारच्या पश्चिमेकडील एका रुग्णालयात धक्कादायक आणि तितकाच संतापजनक प्रकार घडला आहे. प्रसुतीसाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेचं नवजात बाळ जमिनीवर पडलं. या बाळाची प्रकृती चिंताजनक असून, ठाण्यातील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाने निष्काळजीपणा केल्याचा गंभीर आरोप संबंधित महिलेने केला आहे.
सात महिन्यांची गरोदर महिला या रुग्णालयात गेली होती. तिच्या पोटात वेदना होत होत्या. तिने याबाबत तिथे असलेल्या परिचारिकेलाही सांगितले. पण तिने दुर्लक्ष केले, असा आरोप महिलेने केला.
नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. त्याच्यावर ठाणे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत रुग्णालयाच्या व्यवस्थापकाशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान या घटनेची चौकशी करून, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
संबंधित गरोदर महिला बुधवारी प्रसुतिवेदना सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल झाली होती. प्रचंड वेदना होत असल्याचे, तसेच प्रसुती कोणत्याही क्षणी होईल असे वाटत असल्याचे गर्भवतीने वारंवार डॉक्टर आणि परिचारिकांना सांगितले. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असा आरोपही तिने केला. याबाबत रुग्णालयाच्या डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी भेटणे टाळले. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.