Pune crime news  saam tv
Video

Pune Crime : पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, स्वारगेट बस डेपोत पहाटे नेमकं काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम

Shocking Crime in Pune : पुण्यात स्वारगेट एसटी डेपोत एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आला. एसटी डेपोत पहाटेच्या सुमारास नेमकं काय घडलं, याबाबतचा संपूर्ण घटनाक्रम.

Nandkumar Joshi

पुण्यात स्वारगेट एसटी बस डेपोत शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर नराधमानं बलात्कार केला. पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. पुण्यात गुन्हेगारी वाढली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

या घटनेनंतर संताप व्यक्त होत आहे. विविध स्तरांतून प्रतिक्रिया येत आहेत. मी आयुक्तांशी बोललो आहे. संबंधित गुन्हेगार सापडला पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. या शहरात असे कुठले प्रकार चालू दिले जाणार नाहीत. तशा सूचना दिलेल्या आहेत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

नेमकं काय घडलं?

२६ वर्षांची तरुणी पुण्याहून फलटणकडे निघाली होती.

पहाटेच्या सुमारास पीडित तरुणी स्वारगेट बस डेपोत पोहोचली.

फलटणकडे जाणाऱ्या बसची ती वाट बघत उभी होती.

त्याचवेळी दत्तात्रेय गाडे हा आरोपी तिच्याकडे आला.

त्याने पीडितेशी ओळख वाढवली.

तिच्याशी गोड गोड बोलून तिच्याकडून माहिती काढून घेतली.

एसटी बस दुसरीकडे थांबल्याचे या आरोपीने तिला सांगितले.

अंधारात कोपऱ्यात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेलं.

तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तो पळून गेला.

आरोपीवर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reel Star Death: प्रसिद्ध मराठमोळ्या रिलस्टारचं निधन; राहत्या घरी आढळला मृतदेह, मनोरंजन सृष्टीत खळबळ

Maharashtra Live News Update : मुंबईच्या ओशिवरा परिसरात झोपडपट्टीला मोठी आग

Chanakya Niti : गुढीपाडव्याचं गिफ्ट न देता बायकोला खूश कसं कराल? लक्षात ठेवा या ६ गोष्टी

युद्ध जवळजवळ संपलं, डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान, तिसरे महायुद्ध टळले? VIDEO

युद्धामुळे बाजार ढवळून निघालं, सोने-चांदीच्या दरांनी गाठला विक्रमी उच्चांक, आजचा दर काय? VIDEO

SCROLL FOR NEXT