Shirdi Police file FIR against 47 Sai Sansthan officials in ₹77 lakh electrical theft case; major action after High Court order. Saam Tv
Video

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Sanjay Kale exposes corruption in Shirdi Sai Trust: शिर्डी साई संस्थानच्या विद्युत विभागातील ७७ लाखांच्या साहित्य चोरी प्रकरणी तब्बल ४७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Omkar Sonawane

शिर्डी: साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागातील तब्बल 77 लाख रुपये किंमतीचे विद्युत साहित्य चोरीला गेल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. शिर्डी पोलिस ठाण्यात साई संस्थानच्या 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून करण्यात आली आहे. काळे यांनी 2022 साली संस्थानच्या विद्युत विभागात मोठ्या प्रमाणात साहित्य गायब झाल्याची तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून पोलिसांनी प्राथमिक तपासामध्ये लाखो रुपयांच्या चोरीची पुष्टी केली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये त्या काळातील विभाग प्रमुख, अभियंते, सहाय्यक कर्मचारी आणि इतर संबंधित अधिकारी यांचा समावेश आहे. शिर्डी पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे साई संस्थान प्रशासनात मोठी खळबळ माजली असून, या प्रकरणाचे सर्व तपशील लवकरच समोर येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Maharashtra News Live Update: नांदणी मठाची माधुरी हत्ती नांदणी मठाकडे येण्याचा मार्ग मोकळा

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

Railway News : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! मुंबईसह ७ हाय-डेंसिटी कॉरिडॉरच्या चौपदरीकरणाला मंजुरी

Face Care: चेहऱ्यावर वारंवार दिसतात व्हाइटहेड्स? डॉक्टरांनी सांगितलेले सोपे उपाय नक्की करुन बघा, ५ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT