Shashikant Shinde appointed as NCP (Sharad Pawar) Maharashtra President; takes over from Jayant Patil after seven years. Saam Tv
Video

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष? कोण आहेत शशिकांत शिंदे|VIDEO

Shashikant Shinde biography And Political Career: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. जयंत पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शिंदे १५ जुलैला पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या राजकीय प्रवासाची माहिती जाणून घ्या.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे हे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करा अशी शरद पवारांना विनंती केली होती.

जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष होते. 10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी शरद पवारांना दुसरे कोणाला तरी संधी द्या अशी विनंती केली होती. मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली. सात वर्षाचा कालावधी दिला. शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वादेखत साहेबांना विनंती करेन, शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणे आवश्यक आहे. त्यानंतर आज जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. शशिकांत शिंदे हे आता नवीन प्रदेशाध्यक्ष होणार आहे. ते नेमके कोण आहे? पाहा व्हिडिओमध्ये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election commission : निवडणुकीची घोषणा, याद्यांचा घोळ कायम; पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोगाची भंबेरी, VIDEO

Mumbai : मुंबईत मानवतेला काळिमा! १ महिन्याचे बालक कचऱ्यात फेकले; समाजाला हादरवणारी घटना

Neral Matheran Train : शिट्टीचा आवाज घुमणार! माथेरानला बिंदास्त फिरायला जा, ‘हिल क्वीन’ गुरूवारपासून धावणार

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

SCROLL FOR NEXT