VIDEO: लाडकी बहीण योजनेवरुन Sharad Pawar यांचं महायुती सरकारवर टीकास्त्र Saam TV
Video

VIDEO: लाडकी बहीण योजनेवरुन Sharad Pawar यांचं महायुती सरकारवर टीकास्त्र

Sharad Pawar Press Conference News: लोकसभेइतका स्पष्ट निकाल विधानसभेत लागला तर आनंद, शरद पवार यांची पत्रकार परिषद.

Uday Satam

शरद पवार यांची पत्रकार परिषद पार पडली. यादरम्यान त्यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. लोकसभेइतका स्पष्ट निकाल विधानसभेत लागला तर आनंद होईल, विभानसभेत जनतेला बदल हवाय असं शदर पवार म्हणाले. संसदेच्या अधिवेशनानंतर महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर चर्चा होणार असल्याचंही शरद पवार यांनी सांगितलं. दरम्यान त्यांनी जागावाटपा संदर्भातील त्यांची भूमिका देखील स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीतील डाव्या पक्षांना जागा देण्याची भूमिका असल्याचं शरद पवार म्हणाले. पक्षात येण्यासाठी काहींनी इच्छा व्यक्त केली आहे, मात्र त्यावर सरसकट निर्णय घेऊ नये अशी पक्षाची भूमिका असल्याचं शरद पवार म्हणाले. तर पक्षात घ्यायचं की नाही हे नेते ठरवतील असं देखील पवार यांनी सांगितलं आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण सारख्या योजना आणून एखाद-दुसरा हप्ता देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thackeray Group 1st List: CM शिंदेंविरोधात दिघेंना उमेदवारी, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा...

Diwali Picnic Spot : दिवाळीत 'या' ठिकाणी लाँग ट्रीप प्लान करा, जोडीदार होईल खूश

Maharashtra News Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Maharashtra Election : CM एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने निष्ठावंत उतरवला; आतापर्यंत कोणाला मिळाले एबी फॉर्म ? वाचा

Mahayuti News : अजित पवारांसह फडणवीस दिल्लीकडे रवाना; काय आहे कारण, पाहा Video

SCROLL FOR NEXT