Sharad Pawar SaamTv
Video

Sharad Pawar : कुठे इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी; शरद पवारांचा अमित शहांवर निशाणा | Video

Sharad Pawar Press Conference : शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. गृहमंत्र्यांनी जे भाषण केले. त्यावर न बोलले बरे, असं त्यांनी म्हंटलं आहे.

Saam Tv

स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशचे पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी देशाचं गृहमंत्रीपद सांभाळलं. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे सुद्धा गृहमंत्री होते. होते. या सर्वांनी पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा ठेवली. गृहमंत्र्यांनी जे भाषण केले. मी आणि उद्धव ठाकरेंवर जे भाष्य केले त्यावर न बोलले बरे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं आहे. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी, अशी मराठीत म्हण आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, स्वातंत्र्यानंतर अत्यंत प्रभावी आणि सर्व देशाचे राज्यांना एकत्रित करण्याचे काम सरदार पटेल यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर केलेले आरोप हे हास्यास्पद आहे. देशाच्या इतिहासात अनेक जण गृहमंत्री झाले पण आतापर्यंत कुणालाही तडीपार करण्यात आले नाही, असे म्हणत शरद पवार यांनी शहा यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जेव्हा अमित शहा गुजरातमध्ये राहू शकत नव्हते तेव्हा त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे सहकार्य घेतले. अमित शहांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी उत्तर देतील. 1978 मध्ये मी मुख्यमंत्री असताना गृहमंत्री कुठे होते माहिती नाही. त्यांना माहिती नसेल पण जनसंघाच्या अनेक नेत्यांनी माझ्या मंत्रिमंडळात काम केले आहे, अशी शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

BP अचानक वाढतोय? सकाळी ही 6 पेये ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT