Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Digital
Video

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

batmi magchi batmi : शरद पवारांनी निवडणूक लढवणार, असं भाष्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. त्यावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर नेमकं काय घडलं होतं?

Vishal Gangurde

मुंबई : राष्ट्रीय राजकारणात राजकारण्यांनी निवृत्त कधी व्हावं, कोणत्या वयात व्हावं हा कळीचा मुद्दा ठरत आहे. हाच मुद्दा बारामतीतही तितकाच महत्वाचा आहे. काकांनी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी पुतण्याला सल्ला दिला. आपण ३० वर्षे राजकारण केलं. त्यानंतर सक्रिय राजकारणातून बाजूला झालो. तुम्हीही व्हा. नव्या पीढीला संधी द्या. पुढे अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. अजित पवार म्हणाले,'काका म्हणत आहेत, मी निवृत्त होणार आहेत. मी म्हणालो नाही. ते निवृत्त झाल्यावर हाच पठ्ठा आहे, तो विकास करू शकतो. हा घास इतराला घेण्यासारखा नाही. दरम्यान, त्यांनी काकांच्या विधानावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला.

काकांसाठी हे प्रत्युत्तर धोक्याची घंटा होती. त्यानंतर काकांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. आपण राजकारणातून निवृत्त झालो तरी सक्रीय समाजकारणातून निवृत्त होणार नाही. महाराष्ट्राच्या पुढच्या विकासाचा आराखडा आपण आखू. मगच निवृत्त होऊ, असे ते म्हणाले. काका आणि पुतण्या एकही कुरघोडी करण्याची संधी सोडत नसल्याचं बारामतीत चित्र आहे. त्यामुळे निवृत्त इथं सहजतेने होईल, असं काही दिसत नाही. त्यामुळे राजकारणातून कधी निवृत्त व्हावं, याचं उत्तर मिळणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Assembly Election: निकालाआधीच महाविकास आघाडीमध्ये पडद्यामागं काही तरी घडतंय?

SCROLL FOR NEXT