beed crime saam tv
Video

Beed Crime: गॅसचा पाईप, गाडीच्या वायरचा चापका, लाकडी बांबूच्या काठीने देशमुखांना मारहाण, शरीरावर १५०हून अधिक जखमा; अहवालात काय काय? VIDEO

Sarpanch Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख यांना ज्या हत्यारांनी मारहाण करण्यात आली होती. त्या हत्यारांचा अहवाल साम टीव्हीच्या हाती लागला आहे.

Omkar Sonawane

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यानं बेदम मारहाण करण्यात आली होती. ही मारहाण करताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. आरोपींनी संतोष देशमुख यांना गॅसचा पाईप, गाडीच्या वायरच्या चापकाने, लाकडी बांबूची काठी आणि लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली होती. या हत्यारांचा परीक्षण अहवाल आता समोर आला आहे. चार विशेष हत्यारांनी संतोष देशमुख यांना बेदम मारहाण झालेली आहे असे अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.

या मारहाणीमध्ये जवळपास 150 हून अधिक जखमा संतोष देशमुख यांच्या शरीरावरती आढळून आल्या होत्या. या संपूर्ण बाबींचा अहवाल आता न्यायालयामध्ये सादर करण्यात आला असून तीन डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात या हत्यारामुळे मारहाण झाल्यास मृत्यू होऊ शकतो असे नमूद केले आहे. या अहवालामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT