Manoj Jarange SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : मंत्र्यांना बोललो म्हणजे जातीला बोललो असं आहे का? जालन्याच्या जनआक्रोश मोर्चातून जरांगेंचा सवाल | Video

Manoj Jarange News : संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन, मोर्चे सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज जालन्यात देखील जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनोज जरांगे देखील सहभागी झाले आहेत.

Saam Tv

धनंजय मुंडे हे कोणत्या जातीचे नाही तर सरकारचे मंत्री आहेत. मंत्र्यांना बोललो म्हणजे जातीला बोललो का? असा प्रश्न मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज जालना येथे आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात जरांगे देखील सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी बोलो तर जातीयवाद होतो का? धनंजय देशमुख यांना तुम्ही पोलीस ठाण्यात धमकी देतात. आम्ही गुंडांवर बोलायचे नाही का? धनंजय मुंडे हे कोणत्या जातीचे नाही तर सरकारचे मंत्री आहेत. ते ओबीसीचे पांघरुण घेत आहे. मंत्र्यांना बोललो म्हणजे जातीला बोललो असं आहे का? तुम्हाला आमचे लोकं कापायचे आहे का? आम्ही कोणत्या जातीचे नाव घेतले का? जनता मंत्र्यांनाच बोलत असते. रस्त्यावर फिरू देणार नाही हे जनता रोषाने बोलते, अशी संतप्त प्रतिक्रिया जरांगे यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT