Krushna Andhale SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : 'तुझा संतोष देशमुख करू', अशी धमकी देणाऱ्या फरार कृष्णा आंधळेच्या मित्रांना अटक | VIDEO

Beed Crime News : संतोष देशमुख हत्येच्या बातम्या का बघतो असा जाब विचारत फरार आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांनी धारूरमध्ये एका तरुणाला मारहाण केली होती. त्यानंतर बीड पोलिसांनी या दोघांना कर्नाटकातून अटक केली आहे.

Saam Tv

तुझा संतोष देशमुख करू, अशी धमकी देणाऱ्या फरार कृष्णा आंधळेच्या दोन्ही मित्रांना बीड पोलिसांनी कर्नाटकातून अखेर अटक केली आहे. वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी या दोघांची नावं आहेत.

सरपंच संतोष देशमुख हत्ये संदर्भात बातम्या बघत असलेल्या एका तरुणाला धारूरमध्ये वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांनी अमानुष मारहाण केली. तसंच तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी देखील दिली होती. या घटनेत अशोक मोहिते हा गंभीर जखमी झाला आहे. या तरुणावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चौकशी दरम्यान हे दोघे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचे मित्र असल्याचं समोर आलं. त्यानंतर धारूर पोलिसांचं पथक या दोघांना शोधण्यासाठी रवाना करण्यात आलेलं होतं. त्यानंतर कर्नाटकातून त्यांच्या मुसक्या अवळण्यात आलेल्या आहेत. आता त्यांच्याकडून कृष्णा आंधळेचा ठाव ठिकाणा कळणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचा राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Parliament Winter Session: लोकसभेत गोंधळात 'G Ram G' विधेयक मंजूर, विरोधकांनी फाडल्या विधेयकाच्या प्रती

Face Care: चेहऱ्यावर अ‍ॅलोव्हेरा जेल लावल्याने चेहरा फक्त ग्लो होत नाही तर 'हे' त्रासही होतात कायमचे दूर

ज्ञान पाजळणाऱ्या पुणेकरांना परदेशी नागरिकानं शिकवला धडा|VIDEO

माझ्या बायकोला घरी पाठवा हो....सासूच्या पायावर लोटांगण घालून जावई धायमोकळून रडू लागला, Viral Video बघून काय म्हणाल?

SCROLL FOR NEXT