Beed News SaamTv
Video

Santosh Deshmukh Case : सरपंच हत्या प्रकरणाच्या बातम्या का बघतो? आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्रांची तरुणाला बेदम मारहाण | VIDEO

Dharur Crime News : बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील बातम्या का बघतो म्हणत याच प्रकरणात आरोपी असलेल्या कृष्णा आंधळे याच्या मित्राने एका तरुणाला धारूरमध्ये अमानुष मारहाण केली आहे.

Saam Tv

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संबंधित बातम्या का पाहातो? असा जाब विचारत आरोपी कृष्णा आंधळेच्या मित्राने धारूरमधील एका तरुणाला बेदम मारहाण केलेली आहे. या मारहाणीत अशोक मोहिते हा तरुण गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

बीडमधले माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात असलेल्या संबंधित बातम्या का बघतो? असा सवाल करत आता याच प्रकरणातील आरोपी असलेल्या कृष्णा आंधळे याच्या मित्राने एका तरुणाला अमानुष हरण केल्याची घटना धारूरमध्ये घडली आहे. या घटनेत अशोक मोहिते हा गंभीर जखमी झाला आहे. तर वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावं आहेत. अशोक मोहिते याला अत्यंत अमानुषपणे ही मारहाण करण्यात आलेली असून त्याच्यावर सध्या लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाणीनंतर हे दोघेही फरार झाले असून या दोन्ही आरोपींच्या अटकेसाठी धारूर पोलिसांचं एक पथक देखील रवाना करण्यात आलेलं आहे. धारूर पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT