Santosh Deshmukh Case  Saam Tv
Video

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट; सीआयडीला सापडला मोठा पुरावा,VIDEO

Santosh Deshmukh Case update : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ सीआयडी अधिकाऱ्यांना मिळाल्याची माहिती हाती आली आहे.

Saam Tv

बीड : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती आली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ सीआयडी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून या व्हिडिओला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

बीडच्या मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अपहरणादरम्यान वापरण्यात आलेली काळ्या रंगाची गाडी पोलिसांनी दुसऱ्या दिवशी जप्त केली होती.. याच कारमध्ये पोलिसांना दोन मोबाईल आढळले. या मोबाईलमध्ये सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याची चर्चा होती. तर याच मोबाईलवरून एका नेत्याला फोन देखील केल्याची माहिती पुढे येत आहे. मागील ४ दिवसांपासून सीआयडीचे पथक बीडमध्ये तळ ठोकून आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. तर सीआयडीचे विशेष पथक बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहे. उपलब्ध माहितीच्या आधारे सीआयडीचा सध्या तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT