Santosh Deshmukh Case Saam Tv
Video

Santosh Deshmukh Case: 'संतोष देशमुखांचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवा', महंत नामदेव शास्त्रींचं मोठं विधान

Mahant Namdev Shastri: दोन दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांचे मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापची लाट उसळली आहे. यावर आता महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Priya More

राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रथमच भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी प्रतिक्रिया दिली असून महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी मारहाण करणाऱ्यांची मानसिकता तपासायला पाहिजे होती असे वक्तव्य सुरुवातीला केले होते. त्यामुळे राज्यात एकच गदारोळ उडला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी संतोष देशमुख यांचे मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापची लाट उसळली आहे. यावर आता महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'ही गोष्ट मला आधी माहिती नव्हती. मात्र दुसऱ्या दिवशी जेव्हा धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय येऊन मला भेटले आणि ते गडाचे अनुयायी आहेत हे समजल्यानंतर माझी भावना बदलली. मला जाणीव निर्माण झाली. निश्चित भगवानगड संतोष देशमुख कुटुंबीयांच्या पाठीशी असून लोकांनी गैरसमज करू नये. मला जाणीव झालेली आहे. न्यायालयाकडे विनंती करतो की हे प्रकरण लवकरात लवकर फास्टट्रॅक कोर्टात चालवून संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा.', अशी प्रतिक्रिया महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT