Sanjay Shirsat News SaamTv
Video

Sanjay Shirsat : 'त्या' व्हीडिओवर संजय शिरसाट स्पष्टच बोलले : Video

Saam Tv

पुराची पाहणी करण्यासाठी आलेले भंडारा - गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या स्टंटबाजीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. तुमसर तालुक्यातील पूराची पाहणी करण्यासाठी खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी गाडीच्या बोनेटवर बसून पूरपरिस्थितीची पाहणी केल्याचा हा व्हिडिओ आहे. त्यांच्या या स्टंटबाजीची सगळीकडे चर्चा होत आहे. जनता पूराने त्रस्त असताना खासदार स्टंट करण्यात व्यस्त असल्याच्या टीका त्यांच्यावर केल्या जात आहे. या घटनेवर आमदार संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. '' असली स्टंटबाजी आपल्याला परवडणार नाही.'' असं शिरसाट आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.

''पूरपरिस्थितीत जनतेला मदत करण्याचा आपला पहिला हेतू असला पाहिजे. खासदार पडोळे यांनी रील काढलं ही चुकीचच आहे. त्याबद्दल त्यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र यापुढे अशी स्टंटबाजी करणं आपल्याला परवडणारं नाही ही लक्षात घेतलं पाहिजे.'' असंही संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे. मात्र अशी स्टंटबाजी करून शेतकऱ्यांची थट्टा खासदार करत आहेत का? असा सवाल या प्रकरणामुळे उपस्थित होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT