Sanjay Raut saam tv
Video

Sanjay Raut: पंतप्रधान मोदींनी स्वातंत्र्यदिनी खोटं बोलू नये; संजय राऊतांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणावर संजय राऊत यांनी टीका केली. युवा शक्तीचा उल्लेख करत ७५ वर्षे वय झालेल्या नेत्यांनी सत्ता तरुणांच्या हातात द्यावी, असा टोला राऊत यांनी मोदींना लगावला. विरोधकांवरील आरोपांनाही त्यांनी प्रत्युत्तर दिलं.

Surabhi Jayashree Jagdish

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशातील युवा शक्तीचे आभार मानले असतील, तर मीही मोदींचे आभार मानतो, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. हा देश कायमच युवा शक्तीच्या जोरावर पुढे गेला आहे, त्यामुळे ज्यांचं वय ७५ वर्षे झालं आहे, त्यांनी सत्ता सोडून ती तरुणांच्या हातात द्यावी, असा टोला राऊत यांनी मोदींना लगावला. मीडियाशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणावर जोरदार टीका केली.

कोरोना काळात आणि देशासमोर आलेल्या इतर संकटांमध्ये विरोधकांनी देशात भीती आणि संकटाचं वातावरण निर्माण केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. या आरोपावरही राऊत यांनी मोदींना उत्तर दिलं. मोदी खोटं बोलत आहेत, किमान स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तरी खोटं बोलू नये, असं राऊत म्हणाले. आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि या देशासाठी हजारो-लाखो तरुणांनी आपला जीव दिला आहे, असं त्यांनी सांगितलं.

देशासाठी बलिदान देणाऱ्या या तरुणांचं स्मरण करण्याऐवजी पंतप्रधानांकडून अशा प्रकारची विधानं केली जात असतील, तर हे आपलं दुर्दैव आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली. स्वातंत्र्यासाठी अनेक तरुणांनी आपलं आयुष्य देशासाठी अर्पण केलं आणि त्यांच्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळालं, असं सांगत राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या विधानांवर नाराजी व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 30 तारखेआधीच मिळणार पगार; सरकारचा मोठा निर्णय

Fact Check: नोटांचे बंडल आणणारा कावळा? 500 च्या नोटांचं बंडल खिडकीत आणून ठेवलं?

मोठी बातमी ! राज्यातील विद्यापीठांमध्ये ३५ वर्षांनी पुन्हा उडणार निवडणुकांचा धुरळा, सरकारचा मोठा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची प्रदेश कमिटी बरखास्त; पक्षात खळबळ

Fact Check : मोबाइल नंबर अपडेट केला नाही तर ड्रायव्हिंग लायसन्स होणार रद्द? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

SCROLL FOR NEXT