सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील मांगले येथे रविवारी सकाळी अवकाशातून तब्बल 7 किलो वजनाचा बर्फाचा मोठा गोळा उसाच्या शेतात कोसळल्याची आश्चर्यकारक घटना घडली. मोरणा नदीकाठावरील समीर रमेश कुलकर्णी यांच्या शेतात सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. प्रचंड वेगाने आणि मोठ्या आवाजासह बर्फाचा गोळा जमिनीवर आदळल्याने शेतात मोठा खड्डा पडला. विशेष म्हणजे, 6 तासांनंतरही बर्फ पूर्णपणे वितळला नव्हता. या दुर्मिळ घटनेमुळे परिसरात आश्चर्य आणि कुतूहल व्यक्त होत आहे.
मांगले येथील मोरणा नदीकाठावर समीर कुलकर्णी यांचे उसाचे शेत आहे. रविवारी सकाळी गावडे हे शेतात ठिबक सिंचनाच्या पाइप पसरत होते. त्यावेळी त्यांना आकाशातून ड्रोनसारखी एखादी वस्तू खाली येताना दिसली. काही क्षणांतच ही वस्तू प्रचंड वेगाने कुलकर्णी यांच्या उसाच्या शेतात आदळली. त्याचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील शेतकरीही हादरले. आवाजाच्या दिशेने धाव घेतल्यानंतर शेतात मोठा खड्डा पडल्याचे आणि त्यामध्ये बर्फाचा मोठा गोळा फुटलेल्या अवस्थेत असल्याचे दिसले. या गोळ्याचे वजन अंदाजे 7 किलो असल्याचे सांगण्यात आले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.