Sangli News  Saam Tv
Video

Sangli News: निधी मिळूनही रस्ते-गटारीचे काम अपूर्णच, महापालिकेच्या गेटवर दूषित पाणी फेकून केले आंदोलन,VIDEO

Sangli Municipal Corporation: सांगली महापालिकेच्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधात दलित महासंघाने एक अनोखे आंदोलन करून निषेध व्यक्त केला.

Omkar Sonawane

सांगली शहरातील रस्त्यांवर गटारीचे आणि पावसाचे पाणी साचल्याने संपूर्ण शहरात दुर्गंधी पसरली आहे. या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त दलित महासंघाने मोर्चा काढून सांगली महापालिकेच्या गेटवर हे दूषित पाणी फेकून तीव्र निषेध व्यक्त केला.

शहरातील रस्त्यांची कामे सुरू असली तरी गटारींची योग्य व्यवस्था नसल्यामुळे पावसाचे व गटारीतील सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही, रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी आणि सुशोभीकरणासाठी केवळ टेंडर जाहीर करण्यात आले. निधी परत जाईल या भीतीने घाईघाईत रस्ते उकरून डांबरीकरणाचे काम केले जात आहे, मात्र गटारींसाठीच्या टेंडर प्रक्रियेला फक्त कागदावरच मंजुरी मिळाली आहे.

यामुळे नव्याने तयार झालेल्या रस्त्यांवर पाणी साचत असून, वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. याच दूषित पाण्याचा कंटेनर घेऊन दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या दारात ओतून निषेध आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT