Koyna Dam Saam TV
Video

Sanagli : सांगलीत मुसळधार पावसाचा प्रभाव, कोयना धरणाचे ६ दरवाजे उघडले | VIDEO

Koyna Dam : सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले आहेत. सध्या ११,४०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून, नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, कोयना नदीवरील जुना पूल पूर्णतः पाण्याखाली गेल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नदीकाठच्या परिसरातील नागरिकांनी सर्तक राहावे, असे आवाहन प्रशासनाने केलं आहे. धरण परिसरात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज असून, स्थानिक नागरिकांनाही आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाफेडने मांडला कांदा खरेदीचा खेळ; पहिल्याच दिवशी फज्जा, बळीराजाची थट्टा

Malpua Recipe: घरच्या घरी बनवा खमंग आणि गोड मालपुआ, वाचा सोपी रेसिपी

Samir Choughule: समीर चौघुले घेऊन येतोय नात्यांचा गोडवा; 'साखर खाल्लेला माणूस'ची प्रदर्शन तारीख जाहीर

राज्यात बोगस शाळांचा सुळसुळाट; बोगस शाळांची यादी 'साम टीव्ही'च्या हाती

Fact Check : 200 च्या नोटेवर अब्दुल कलाम? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

SCROLL FOR NEXT