Sanjay Raut saam tv
Video

Maharashtra Politics: आम्ही सकारात्मक आहोत असे बोलून युत्या होत नाहीत, संदीप देशपांडे यांचा संजय राऊतांना टोला|VIDEO

No Proposal Yet from Shiv Sena: आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे युती संदर्भात वक्तव्य केले होते. यावरच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे.

Omkar Sonawane

राज ठाकरेंनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येण्यास काही अडचण नाही आमच्यातले वाद शिल्लक आहे असे विधान केल्यानंतर राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणातून सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, काही दिवसांनी दोघेही बंधू परदेश दौऱ्यावर असल्याने या चर्चेला काहीशी विश्रांती मिळाली होती.

आता या चर्चा पुन्हा रंगू लागल्या आहेत. यावरच आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. ते म्हणाले होते की मनसे सोबत युती ही आमची भूमिका आहे हे आम्ही जाहीरपणे सांगतो किंबहुना दिल से सांगतो असे महत्त्वपूर्ण विधान केल्यानंतर यावरच आज मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले, रोज पत्रकार परिषदा घेऊन आम्ही सकारात्मक आहोत एवढं बोलून यूत्या होत नसता मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की न पडद्यामागून न पडद्याआडून कुठलाही आम्हाला त्यांच्याकडून अजून प्रस्ताव आलेला नाही किंवा संपर्कही झाला नाही त्यांनी प्रस्ताव पाठवावा त्यावर राज ठाकरे निर्णय घेतील असे संदीप देशपांडे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT