छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात दिव्यांग आक्रोष मोर्चाला सुरूवात झाली आहे. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. क्रांती चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा असणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. या मोर्चाला परवानगी मिळत नव्हती. त्यामुळे बच्चू कडू यांनी हा मोर्चा निघणारच असा इशारा दिला होता. त्याप्रमाणे त्यांनी आज मोर्चा काढला. या मोर्चाला सुरूवात झाली असून मोठ्यासंख्येने शेतकरी, महिला, तरुण आणि दिव्यांग या मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्यांचे फलक हातामध्ये घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. जवळपास दीड ते दोन लाख शेतकरी आणि दिव्यांग या मोर्चात सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.