छत्रपती संभाजीनगरमध्ये जीवघेणी स्टंटबाजी करण्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. स्टंटबाजी करण्यासाठी एक तरुण संभाजीनगरच्या मुख्य रस्त्यावरती चालत्या बुलेटवर उभा राहत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगरात मुख्य रस्त्यावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी केली आहे. स्टंटबाजी करण्यासाठी बुलेटवर उभे राहून दोन्ही हात रिकामे सोडून एक तरुण स्टंटबाजी करत आहे. या स्टंटबाजीमुळे अपघातालाही आमंत्रण दिले जात आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकून स्टंटबाज तरुणाने व्हायरल केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मोंढा उड्डाणपूलपासून आकाशवाणी कार्यालयासमोरच्या मुख्य रहदारीच्या रस्त्यावर ही स्टंटबाजी करण्यात आली आहे. सध्या पोलीस या स्टंटबाजाच्या शोधात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.