Sambhaji Raje SaamTv
Video

Sambhaji Raje : सगळ्यांचा बॉस धनंजय मुंडेच; संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून संभाजीराजेंचा थेट आरोप | VIDEO

Santosh Deshmukh Case : छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात आज सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Saam Tv

या सगळ्यांचा बॉस धनंजय मुंडे आहे. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ते राजीनामा का द्यावा म्हणत आहेत. पण आत गेलेले हे लोक कोणाचे आहेत? वाल्मिक कराड हा कोणाचा माणूस आहे? तुमचा संबंध नाही, मग एकदा राजीनामा देऊन तर बघा, होऊन जाऊ द्या फेअर ट्रायल. हे सरकार धनंजय मुंडे यांना का संरक्षण देत आहे? अजित पवार का संरक्षण देता आहेत? आम्ही हे राज्यपाल महोदयांसमोर मांडणार आहे, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे छत्रपती केली आहे. बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी घ्यावा तसेच इतर मागण्यांसाठी आज छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. या भेटीपूर्वी संभाजीराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, जे गुन्हे लावलेत, त्यातून ते सहज बाहेर पडू शकतात. वाल्मिक कराडलासुद्धा खंडणीच्या आरोपात आत घेतलय. या केसशी कनेक्टेड असल्यामुळे त्या पद्धतीने गुन्हे नोंद केले पाहिजे. हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आहे. पंकजा मुंडे बोलल्या आहेत. वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंच पानही हलत नाही. मग, आज गप्प का? असा प्रश्न उपस्थित करत हा एकट्याचा विषय नाही. महाराष्ट्राचा विषय आहे. महाराष्ट्राला हे परवडणार आहे का? असंही संभाजी राजेंनी म्हंटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

Bank Holiday June 2026: महत्त्वाची बातमी! जून महिन्यात इतक्या दिवस बँका बंद, तारखा आताच नोट करा

Vaibhav Sooryavanshi: जिंकली आरसीबी, हवा मात्र वैभवची; मिळाले 5 अवॉर्ड्स, लाखो रूपये आणि नवी कोरी कार

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Saphale Fort : पाऊस अन् ट्रेकिंग, वीकेंडला करा सफाळेजवळील 'या' किल्ल्याची सफर

SCROLL FOR NEXT