कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. समर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करुन छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिल्याचं वक्तव्य अमित शहा यांनी केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अमित शहा यांच्या वक्तव्यानंतर अनेक शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावर संभाजीराजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की, 'अमित शहा असे बोलले आहेत का, या संदर्भात मला कल्पना नाही. संत रामदास त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मोठे असतील. मात्र छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास यांना जोडलं जातं, त्यांना गुरू म्हणतात, मात्र असं कदापिही होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु केवळ जिजामाता होते. समर्थ रामदास स्वामी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत जोडणं योग्य नसून ते न पटणारं आहे'.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.