Video

Salman Khan security updates : भाईजानने घेतला बिश्नोई गँगचा धसका, पाहा स्पेशल रिपोर्ट

Salman Khan safety measures : सलमान खानने बिश्नोई गँगचा धसका घेतलाय...वारंवार बिश्नोई गँगच्या धमक्या येत असल्याने सलमान खाननं आता त्याच्या घरात मोठे बदल केलेत. सलमानने धसका घेऊन गॅलेक्सी कशी सुरक्षित केलीये पाहूया...

Tanmay Tillu

सलमान खान काळवीट शिकार प्रकरणामुळे लॉरेंन्स बिश्नोईच्या टार्गेटवर आहे. 2024मध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. इतकच नाही तर, सलमानचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर पुर्ण खान कुटुंब चिंतेत होतं. यामुळे सलमानने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घराची सुरक्षा वाढवलीये.

सलमानने बांद्राच्या गॅलक्सी अपार्टमेंटमधील बाल्कनीमध्ये बुलेट प्रुफ काचा लावल्यात..सलमान खानची सुरक्षा लक्षात घेता त्याच्या बांद्रातील गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये अनेक बदल करण्यात आलेत. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक सीसीटीव्ही, पोलीस सुरक्षाही वाढवण्यात आलीये. तसंच घरातील खिडक्यांमध्ये देखील बदल करण्यात आलाय. काय बदल करण्यात आलेत पाहूया...

बिश्नोई गँगचा सलमानला धसका

सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा

गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पोलीस चौकी

सलमान खानच्या घराला बुलेटप्रुफ काचा

सुरक्षेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर

सरकारकडून सलमानला वाय प्लस सुरक्षा

सलमान खानची स्वत:चीही वेगळी सुरक्षा

गेल्या वर्षी 14 एप्रिल रोजी सलमान खानच्या घरावर 5 राऊंड गोळीबार करण्यात आला होता, त्यानंतर काही महिन्यांनी बाबा सिद्दीकींची हत्या झाली.त्यामुळे आता सलमानने स्वतःसह कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी बुलेटप्रुफ काच घराला लावलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT