kunal kamra Saam Tv
Video

Kunal Kamra : कुणाल कामराची अटक तूर्तास टळली; मद्रास हायकोर्टाकडून दिलासा, VIDEO

Madras High Court: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या गाण्यातून कुणाल कामरा याने टीका केली होती. यानंतर कामराविरुद्ध मुबाईतील काही पोलीस ठाण्यांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाचे विधानसभेत देखील पडसाद उमटले होते.

Omkar Sonawane

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला दिलासा मिळाला आहे. ७ एप्रिलपर्यंत त्याला अटक न करण्याचे आदेश मद्रास हायकोर्टाने दिले आहेत.

कुणाल कामरा यानं कॉमेडी शोमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता बोचरी टीका केली होती. यानंतर काही शिवसैनिकांनी कुणाल कामराने ज्या स्टुडिओमध्ये शो केला होता, त्या स्टुडिओत तोडफोड केली होती. तसेच कामराला अटक करावी अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी केली होती. तशा तक्रारी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या होत्या. कामराविरोधात मुंबईसह महाराष्ट्रात काही ठिकाणी गुन्हेही दाखल झाले होते. मुंबई पोलिसांनी दोन वेळा कामराला समन्स बजावले होते. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी कुणालने मद्रास हायकोर्टात धाव घेतली. त्याच्या अर्जावर आज सुनावणी झाली. हायकोर्टानं काही अटींवर कामराला ७ एप्रिलपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळं तूर्तास तरी कामराची अटक टळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंचायतराज समितीकडून अकोला जिल्हा परिषदेची झाडाझडती

Liver disease symptoms: रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी अचानक ही 3 लक्षणं दिसली समजा लिव्हर खराब होतंय

Walking benefits : दररोज १०,००० पावलं चाला, ३० दिवसांत शरीरात हे बदल होतील?

Dates Benefits: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा २ खजूर; शरीराला मिळतील 'हे' ७ जबरदस्त फायदे

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, राऊतांचे नगरसेवकपद रदद्

SCROLL FOR NEXT