Nashik Teacher Voting Saam Tv News
Video

Nashik News: नाशिक शिक्षक मतदारसंघात बोगस नोंदणी

मतदार नोंदणीचे सर्व नियम धाब्यावर बसवून मतदारांची नोंदणी केल्याचा कोल्हे यांचा दावा आहे.

Rachana Bhondave

Nashik News: नाशिक शिक्षक मतदारसंघात शेकडो बोगस शिक्षक मतदारांची नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी केलाय. सर्व बोगस शिक्षक मतदार नोंदणी झालेले मतदार विद्यमान आमदारांच्या शिक्षण संस्थेतील असल्याचाही विवेक कोल्हे यांचा दावा आहे. ९ वी पास, गॅरेजमधील कामगार, शेतकरी, व्यापारी, जिल्हा बँकेतील कर्मचारी, कपड्यांच्या दुकानात काम करणाऱ्यांची शिक्षक मतदार म्हणून बोगस नोंदणी झाल्याचे आरोप त्यांनी केलेत. अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचे किशोर दराडे यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केलेत. निवडणूक प्रशासनाकडे या संदर्भात पुराव्यानिशी तक्रार करून दाद मागणार असं विवेक कोल्हे यावेळी म्हणालेत. बोगस मतदारांनी मतदान करू नये अन्यथा त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई होऊ शकते, विवेक कोल्हे यांनी बोगस मतदारांना इशारा दिलाय. याशिवाय विद्यमान आमदारांच्या शिक्षण संस्थेत लाखो रुपयांचा स्कॉलरशिप घोटाळा झाल्याचाही कोल्हे यांचा आरोप. दरम्यान या संदर्भात विवेक कोल्हे यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : निर्माल्य टाकण्यासाठी पुलावर थांबले; पतीने सोबत सेल्फी काढताच पत्नीची नदीत उडी, महिलेचा मृत्यू

Nashik : गोदावरीला पूर; जायकवाडी धरण ५२ टक्के भरलं | VIDEO

Mrunal Thakur Photos : जादू तेरी नजर; मृणालचं सौंदर्य पाहून काळजाचा ठोका चुकेल

Maharashtra Live News Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला सुरूवात, उज्वल निकम न्यायालयात दाखल

Heart attack symptoms women: महिलांमध्ये दिसणारी हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा का वेगळी असतात? पाहा महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात

SCROLL FOR NEXT