Ratnagiri News SaamTv
Video

VIDEO : रत्नागिरीत मंत्री उदय सामंतांना दाखवले काळे झेंडे; पाहा काय आहे प्रकरण

Saam Tv

वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आलेल्या मंत्री उदय सामंत यांना सकल हिंदू समाज आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आहेत. त्यामुळे रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ झालेला दिसला. सकल हिंदू समाज आणि भाजपचा रत्नागिरीतील वक्फ बोर्डाच्या कार्यालयाला विरोध होता. त्यामुळे कार्यालयाच्या उद्घाटनावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांकडून कार्यक्रमस्थळी निदर्शने करत वक्फ बोर्डाचे कार्यालय रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली.

या सर्व गोंधळानंतर सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली. वक्फ बोर्डाने भारत मातेचे आणि हिंदू समाजाच्या जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. वक्फ बोर्ड विधेयक प्रलंबित असताना सुद्धा रत्नागिरी शहरामध्ये वक्फ बोर्डाचे कार्यालय आणले जात आहे. हिंदू समाजाचा या वक्फ बोर्ड कार्यालयाला विरोध असून आजच्या कार्यक्रमाचा जाहीर निषेध आहे. प्रशासनाने देखील आम्हाला आंदोलनाचा अधिकार दिला आहे, असे आंदोलकांनी म्हंटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prashant Paricharak: देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी, प्रशांत परिचारक तुतारी फुंकणार?

Rohit Sharma: रोहित कसोटी क्रिकेटला रामराम करणार? जवळच्या व्यक्तीने केला मोठा खुलासा

Maharashtra Politics : मंत्रालयातील मेगाभरतीची घोषणा हवेतच; किती कर्मचाऱ्यांची आहे कमतरता? पाहा व्हिडिओ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची 'दिवाळी', खात्यात येणार 4500 रुपये; बँकेने दंडासाठी कापलेले पैसेही पुन्हा मिळणार

Election Result 2024 : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोणाची सत्ता येणार? कधी आणि कुठं पाहणार निकाल? वाचा

SCROLL FOR NEXT