भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी
महायुतीला आणखी धक्के देण्याचा इशारा दिल्याच्या घटनेला 24 तासही उलटले नाहीत तोच पवारांनी विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि फलटणचे आमदार दीपक चव्हाणांना गळाला लावण्याची योजना आखलीय. दरम्यान रामराजे आणि जयंत पाटलांची भेटीची चर्चा रंगलीय..तर रामराजेंनी फलटणमधील खटके वस्ती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र याआधीच रामराजेंनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिलेत. रामराजेंनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धाबे दणाणले आहेत. त्याची कारणं काय आहेत, ते जाणून घेऊ...
रामराजे शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत. आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा मंत्री म्हणून काम केलं आहे. 13 व्या विधानपरिषदेचे सभापती म्हणून काम पाहिलं होतं. रामराजेंचा पाठींबा ज्याला तो आमदार हे फलटणचं समीकरण आहे. दरम्यान, 2 दिवसापुर्वीच अजित पवारांनी रामराजेंना फोन करून फलटणचे आमदार दीपक चव्हाणांची उमेदवारी जाहीर केलीय.
फलटणमध्ये भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांसोबतचा संघर्ष आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदी डावललं जाण्याची शक्यता आहे. रामराजे दादांना सोडचिठ्ठी देणार असल्याचं वक्तव्य पवारांच्या पक्षाचे उत्तम जानकरांनी केलंय. तर रामराजेंच्या तुतारी फुंकण्याच्या चर्चा अजितदादांच्या राष्ट्रवादीनं फेटाळून लावल्यात.
दादांनी दीपक चव्हाणांना उमेदवारी जाहीर केलीय. मात्र रामराजेंनी तुतारी फुंकण्याचे संकेत दिलेत. त्यामुळे रामराजेंनी तुतारी फुंकली तर अजित पवारांना हा दुहेरी धक्का असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.