Raju Shetty Detained by Police  Saam Tv
Video

Raju Shetty: शक्तीपीठ महामार्गाला विरोध, राजू शेट्टींना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Raju Shetty Detained by Police: शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. आज आंदोलन होणार होते पण त्यापूर्वीच सांगली पोलिसांनी राजू शेट्टी यांना ताब्यात घेतलं.

Priya More

शेतकरी नेते राजू शेट्टी यांना सांगली पोलिसांनी ताब्यात घेतलं. रत्नागिरी - नागपूर महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्गामधील बाधित शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी यांचे आज आंदोलन होणार होते. या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची देखील पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.

शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून राजू शेट्टी यांनी आज आंदोलनाचा इशारा दिला होता. राजू शेट्टी यांनी आज रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला मोठ्यासंख्येने शेतकरी सहभागी होणार होते. या आंदोलनापूर्वीच राजू शेट्टी यांना त्यांच्या शिरोळ येथील निवासस्थातून पोलिसांनी ताब्यात घेतलं.

राजू शेट्टी यांच्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून सध्या धरपकड सुरू आहे. शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संधटनेकडून मागणी केली जात आहे. या मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर आंदोलन करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sandeep Deshpande: आमचा बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, संदीप देशपांडेंनी व्यापाऱ्यांना सुनावलं

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

SCROLL FOR NEXT