Rajsthan Rain Saam TV
Video

Rajsthan Rain : राजस्थानात पावसाचा कहर! मुसळधार पावसामुळे पूर; दोन जण गेले वाहून | VIDEO

Heavy Rain : राजस्थानमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरू आहे. सततच्या जोरदार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, दोन जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजस्थानमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पावसाचा कहर सुरू असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या जोरदार पावसामुळे नद्या-नाले भरून वाहत आहेत आणि रस्ते, पुलांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. कोटा, भरतपूर, बूंदी, सवाई माधोपूर, झालावाड आणि दौसा या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर असून, अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कोटामधील चंबळ नदी धोक्याच्या पातळीवर असून, प्रशासनाने परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

भरतपूर आणि बूंदीमध्ये अनेक घरे पाण्याखाली गेली असून, लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहात दोन जण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली असून, त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या पथकांनी शोध मोहीम सुरू केली आहे. स्थानिक प्रशासन सतर्क असून, एनडीआरएफसह आपत्कालीन बचाव पथकांकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT