raj thackeray uddhav thackeray news  
Video

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपाचे संकेत, उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची तिसऱ्यांदा भेट

raj thackeray uddhav thackeray news : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत, अशी अनेक कट्टर ठाकरे कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यातच आता मागील काही दिवसांत कार्यक्रमात ठाकरे बंधूंची तिसऱ्यांदा भेट झाली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलेय.

Namdeo Kumbhar

Raj Thackeray, Uddhav meet at wedding; spark speculation of rapprochement : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्याला निमित्त ठरलेय, एक लग्नसोहळा. मुंबईतील एका लग्नसोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र आले होते. मागील काही महिन्यात तिसऱ्यांदा ठाकरे बंधूंची भेट झाली आहे. आगामी मनपा निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येणार का? याची चर्चा त्या निमित्ताने सुरू झाली आहे.

एका अधिकाऱ्याच्या लग्नात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये चर्चाही झाली. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का? याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे लग्नातील चर्चा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडून एकत्र येण्याचे कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. सकाळ समुहाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी त्यांनी भूमिका बदलली तरच एकत्र येण्यावर विचार होईल, असे वक्तव्य केले होते. मनसेकडूनही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

अजित पवार विमान अपघाताला नवं वळण; रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Live News Update: पुण्यातील नवले पुलावर अपघातमुळे मोठी वाहतूक कोंडी

Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताची निष्पक्ष चौकशी करा, जय पवारांनाही संशय

SCROLL FOR NEXT