gunratna sadavarte on raj thackrey  Saam Tv
Video

Marathi Language: तुमची मुले कोणत्या शाळेत शिकली? गुणरत्न सदावर्ते यांचा राज ठाकरेंना सवाल

Gunaratan Sadavarte Questions: भय्याजी जोशी यांनी मराठी भाषेवर वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले. यानंतर त्यांच्या समर्थनार्थ गुणरत्न सदावर्ते हे मैदानात उतरले आहे.

Omkar Sonawane

मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा शिकण्याची गरज नाही असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी केले होते. त्यावरून चांगलाच वाद पेटला. त्यानंतर यावरून राज ठाकरे यांनी भय्याजी जोशी यांचा चांगलाच समाचार घेतला. यानंतर भय्याजी जोशींच्या समर्थनार्थ गुणरत्न सदावर्ते हे मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले. सदावर्ते यांनी राज ठाकरे यांना थेट सवाल केला की तुमची मुले कोणत्या शाळेत शिकले? तुमची मुलं ही कॉन्व्हेंट आणि इंग्लिश मीडियम मध्ये शिकली आहे असे बोलून गुणरत्न सदावर्ते यांनी भैय्याजी जोशी यांच्या विधानाला समर्थन दिले.

काय म्हणाले होते भय्याजी जोशी

मुंबईची कुठलीही एक भाषा नाही. मुंबईच्या अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या परिसरात विविध भाषा बोलल्या जातात. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. तर गिरगावमध्ये हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणाऱ्या व्यक्तीने मराठी शिकले पाहिजे असे काही नाही.असे वक्तव्य भय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

Maharashtra Live News Update : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची बैठक

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

SCROLL FOR NEXT