Raj Thackeray addresses followers on Balasaheb Thackeray’s death anniversary, questioning the legitimacy of political groups claiming Hindutva legacy. Saam Tv
Video

Raj Thackeray: बाळासाहेबांची प्रतिमा चोरून वारस होता येत नाही, राज ठाकरे यांचा शिंदे-भाजपवर घणाघात|VIDEO

Balasaheb Thackeray Anniversary Political Post: राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिंदे सेना आणि भाजपवर अप्रत्यक्ष टीका केली. हिंदूंना कधीही मतदार बँक म्हणून पाहिले नाही आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेचा राजकीय वापर करणाऱ्यांनाही त्यांनी लक्ष केले आहे.

Omkar Sonawane

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक पोस्ट लिहून शिंदे सेना आणि भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बाळासाहेबांनी हिंदूंकडे कधीही व्होट बँक म्हणून पाहिले नाही, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. राज ठाकरे म्हणाले, त्यामुळे बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मिरवणाऱ्यांची किंवा त्यावर मत मागणाऱ्यांची गंमत वाटते. ज्यांना ना प्रबोधनकार माहित आहेत. ना बाळासाहेब त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची समृद्धी कळणार नाही असेही ते म्हणाले. भाजपचा कमंडल वाद फोफावण्याआधीच बाळासाहेबांनी हिंदू म्हणून अस्मिता जागी केली होती असेही राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत CNGचा तुटवडा का निर्माण झाला, कधीपासून सुरळीत होणार पुरवठा? महत्त्वाची अपडेट आली समोर

आजी-माजी आमदाराचा वाद विकोपाला, थेट शिवीगाळ अन्...; नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: शाळकरी विद्यार्थ्यावर ऑटो चालकाचा चाकू हल्ला

Strawberry Benefits: हिवाळ्यात स्ट्रॉबेरी खाण्याचे जबरदस्त फायदे

Actress Divorce: प्रसिद्ध अभिनेत्रीचं मोडलं तिसरं लग्न; आता राहणार सिंगल, तरीही म्हणते- माझ्या आयुष्यातला सुंदर आणि सुखी काळ...

SCROLL FOR NEXT