Ancient Shiv-era secret door discovered at Raigad’s historic Tala Fort during a heritage cleanliness drive. saamtv
Video

Raigad Tala Fort: रायगडमध्ये तळगडावर सापडला गुप्त दरवाजा|Video Viral

Raigad Tala Fort : रायगडमधील ऐतिहासिक तळा किल्ल्यावर एक शिवकालीन दरवाजा सापडला. हा दुर्मिळ शोध शिवाजी महाराजांच्या काळातील स्थापत्यशैलीचे वैभव अधोरेखित करतो. दुर्गरत्न प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता मोहिम राबवली जात होती. या वेळी हा गुप्त दरवाजा सापडला.

Bharat Jadhav

रायगडमधील तळा शहरातील ऐतिहासिक तळगड असलेल्या किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा सापडलाय. हा गुप्त दरवाजा शोधण्यासाठी दुर्गरत्न प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी विशेष मेहनत घेतलीय. येथील दुर्गरत्न प्रतिष्ठान मार्फत स्वच्छता मोहिम राबवली जात होती. या वेळी हा गुप्त दरवाजा सापडला. गुप्त दरवाजा सापडल्यानंतर येथे शिवप्रेमींनी विधीवत पुजा करीत जल्लोश साजरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1648 साली तळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. त्यानंतर 1659 साली अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने या तळगडाला वेढा घातला असल्याची माहिती आहे.

अभ्यासकांकडून गडाची माहिती, नकाशा घेत या प्रतिष्ठानच्या शिवभक्तांनी फावडे, टिकाव, पहारी हाती घेऊन हा गुप्त दरवाजा शोधून काढला. हा दरवाजा शोधण्यासाठी दोन मोहिमा राबवण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४८ साली तळगड आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. त्यानंतर १६५९ साली अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने या तळगडाला वेढा घातला होता. तळगड हा किल्ला तसा लहान आहे. त्यामुळे याचा घेरपण लहान असल्याने हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या तळगडावर गुप्त दरवाजा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरे बाप की जगह है क्या! एकमेकींचा बाप काढत ओढल्या झिपऱ्या; अ‍ॅमिटी युनिव्हर्सिटीत पोरींचा तुफान राडा |Video Viral

Maharashtra Live News Update: पुणे भाजपच्या कोअर टीमची रविवारी बैठक

Beed Crime: बीडमधील गुंडाराजला पोलिसांची साथ? गावगुंडांकडून ग्रामरोजगार सेवकाला जबर मारहाण; दोन्ही पाय मोडले, दुचाकीला बांधून ओढलं

प्रवासी वाहनांना अडवून लूटमार! सोलापूर–धुळे मार्ग पुन्हा असुरक्षित|VIDEO

भारतातील सर्वात मोठा घोड्यांचा बाजार महाराष्ट्रात! १० कोटी किंमत, ६९ इंच उंच मोरणीचा रुबाब एकदा बघाच|VIDEO

SCROLL FOR NEXT