थेटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आहे. अभिनेता अल्लू अर्जुनचा नुकताच पुष्पा २ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याच चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी हैदराबादच्या थेटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणावरून अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे.
साऊथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 या चित्रपटाच्या हैदराबाद येथील संध्या थेटरमध्ये प्रीमियरवेळी चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याप्रकरणी आता अल्लू अर्जुन याला अटक केली आहे. अल्लू अर्जुन याला घरातून पोलिसांनी ताब्यात घेतलेय. पोलिस पुढील चौकशी करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.