Pune News AI Image
Video

Pune : पुण्यात अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच; सिंहगड रस्त्यावरील खाऊ गल्लीवर महापालिकेचा हातोडा

Pune Sinhagad News : पुणे महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम सलग चौथ्या दिवशी सुरू. सिंहगड रस्त्यावरील प्रसिद्ध खाऊ गल्लीतील अनधिकृत दुकाने, हातगाड्या आणि अतिक्रमणांवर कारवाई.

Alisha Khedekar

शहरातील सार्वजनिक जागांवर वाढत चाललेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात पुणे महानगरपालिकेने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. सलग चौथ्या दिवशीही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहराच्या विविध परिसरांत धडक मोहीम राबवण्यात आली.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेली दुकाने, हातगाड्या तसेच इतर बांधकामांवर कारवाई केली जात आहे. या मोहिमेचा फटका आता पुण्यातील प्रसिद्ध खाद्यसंस्कृतीचे केंद्र मानल्या जाणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील खाऊ गल्लीला बसला आहे.

या परिसरातील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई करत हटवण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे संबंधित व्यावसायिकांमध्ये हालचाल पाहायला मिळाली. शहरातील वाहतूक कोंडी कमी करणे, पादचाऱ्यांसाठी पदपथ मोकळे करणे आणि सार्वजनिक जागांचा वापर सुरळीत करणे हा या मोहिमेमागील उद्देश असल्याचे मानले जात आहे. आगामी काळातही शहरातील इतर भागांत ही मोहीम सुरू राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death News : भाजप आमदाराचे निधन; राजकीय वर्तुळात हळहळ

Maharashtra News Live Update: शहादा रस्त्यावर लांबोळा गावाजवळ कारचा अपघात

Mumbai News: अल्पवयीन मुलांकडून तरुण-तरुणीला बेदम मारहाण, मुंबईतील संताजनक घटना; VIDEO व्हायरल

Tea Making Tips : चहा उकळताना उतू जातो? फॉलो करा 'या' २ ट्रिक्स, चव बिघडणार नाही अन् किचनचा ओटा राहील स्वच्छ

तुळशीजवळ चुकूनही या 5 गोष्टी ठेवू नका

SCROLL FOR NEXT