Pune SAAM TV
Video

Pune : पुणेकरांची खड्ड्यातून मुक्ती नाहीच! CCTV साठी 550 किमीची रस्ते खोदाई | VIDEO

Pune Pothole Problem : स्त्यातील अडथळे, अतिक्रमण दूर करा, नोव्हेंबर अखेरपर्यंत खड्डे मुक्त करा असे आदेश महापालिका आयुक्तांनी प्रशासनाला दिले आहेत. मात्र त्याचवेळी दुसरीकडे पोलिसांतर्फे शहरातील तब्बल ५५० किलोमीटरचे रस्ते सीसीटीव्हीची केबल टाकण्यासाठी खोदण्यात येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यात खड्डेमुक्त रस्त्यांचे आश्वासन दिल्यानंतरही प्रशासन अडचणीत सापडले आहे. महापालिका आयुक्तांनी नोव्हेंबर अखेरपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आदेश दिले असताना, दुसरीकडे पोलिसांच्या सीसीटीव्ही प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदाई सुरू झाली आहे. नवी पेठेतील राजेंद्रनगरमधून या कामाची सुरुवात झाली असून, शहरातील तब्बल ५५० किलोमीटर रस्ते खोदले जाणार आहेत. एकूण १६०० किलोमीटर खोदाईच्या प्रकल्पात पुणे शहरासह ग्रामीण भाग व पिंपरी-चिंचवडचा समावेश आहे. हा प्रकल्प गृह विभागाने मंजूर केला असून सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविणे गरजेचे मानले जात आहे. मात्र, महापालिकेच्या नियमानुसार पावसाळ्यात खोदाईस बंदी असतानाही अशा कामांमुळे खड्डेमुक्त पुणे प्रत्यक्षात शक्य होणार का? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

SCROLL FOR NEXT