Pune Bomb Saam Tv
Video

Pune Bomb: मोठी बातमी! पुण्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली, ७ तासांचा टाईम सेट; VIDEO समोर

Pune Breaking News: पुण्यामध्ये जिवंत बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्यामुळे खळबळ उडाली. हडपसर परिसरातील प्रसिद्ध रुग्णालयाबाहेरील रस्त्यावर एका बॉक्समध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवण्यात आली आहे. यमध्ये टाईम सेट करण्यात आला आहे.

Priya More

सागर आव्हाड, पुणे

पुण्यातील हडपसर परिसरात आज मोठी खळबळ उडाली जेव्हा कामधेनु इस्टेटच्या पार्किंगसमोरील एका सुपर स्पेशालिस्ट खासगी हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये बॉम्बसदृश संशयास्पद वस्तू आढळून आली. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक अर्थात बीडीएस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हॉस्पिटलमधील एका टॉयलेटमध्ये ही संशयास्पद वस्तू आढळली होती. त्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील हालचालींवर नियंत्रण ठेवण्यात आले.बीडीएस पथकाने या संशयास्पद वस्तूची तपासणी आणि सुरक्षित हाताळणी केली. त्यानंतर ही वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र ही वस्तू नेमकी बॉम्ब होती की इतर काही धोकादायक साहित्य, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, इतक्या मोठ्या खासगी हॉस्पिटलमध्ये सुरक्षा यंत्रणा कितपत सक्षम आहे यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. हॉस्पिटलमध्ये दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आणि नागरिकांची ये-जा असते. अशा ठिकाणी संशयास्पद वस्तू आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही वस्तू नेमकी कोणी ठेवली? एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकाने हे कृत्य केले का? की आर्थिक व्यवहार, बिल किंवा इतर कोणत्या कारणातून हा प्रकार घडला? अशा विविध चर्चांना आणि अफवांना आता परिसरात उधाण आले आहे.

पोलिस आणि संबंधित यंत्रणा सीसीटीव्ही फुटेज, हॉस्पिटलमधील ये-जा करणाऱ्या व्यक्तींची माहिती आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. हॉस्पिटलमधील सुरक्षा व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नेमकं हे कृत्य कोणी केलं? रुग्णाच्या नातेवाईकाचा राग, बिलाचा वाद की इतर कोणतं कारण? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. सध्या पोलीस सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT