पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधील कुकडी प्रकल्पातील पिंपळगाव जोगा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र याच वेगवान पाण्यात पर्यटक तरुणांकडून धोकादायक रॅपलिंग आणि स्टंटबाजी केली जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रवाहाचा वेग वाढला आहे. अशा परिस्थितीत तरुणांकडून जीव धोक्यात घालून रॅपलिंग आणि साहसी स्टंट केले जात आहेत.पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक साहसी प्रकार टाळावेत आणि प्रशासनाने या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची गरज आहे.धरणातून विसर्ग सुरू असताना पाण्यातील ही धोकादायक स्टंटबाजी रोखणार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.