Shivsena Protest Against Rahul Solapurkar Saam Tv
Video

Pune News: राहुल सोलापूरकरांनी नाक घासून माफी मागावी, पुण्यात शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

Shivsena Protest Against Rahul Solapurkar: मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरूनच पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे.

Priya More

मराठमोळे अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध राज्यभरातून केला जात आहे. आता शिवसेना ठाकरे गट राहुल सोलापूरकरांविरोधात आक्रमक झाला आहे. राहुल सोलपूरकर यांनी नाक घासून मागावी अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यासाठी ठाकरे गटाने पुण्यात धिक्कार आंदोलन सुरू केले आहे.

हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढणाऱ्या राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची नाक घासून माफी मागावी यासाठी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक येथे निषेध, धिक्कार आणि जोडे मारो आंदोलन केले जात आहे. हे शिवसैनिक राहुल सोलापूरकर यांच्या घरी जाऊन आंदोलन करणार आहेत.

संतप्त झालेल्या शिवसैनिकाने सांगितले की, 'राहुल सोलापूरकरांच्या तोंडाला काळं फासल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा चेहरा आम्ही रंगवणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम ते कमी करू पाहात आहेत. अशा लोकांना या राज्यातून नाही तर देशातून तडीपार केले पाहिजे. म्हणून आम्ही राहूल सोलापूरकराच्या घरी जाऊन आम्ही आंदोलन करणार आहोत.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Induction Use: गॅस सोडून इंडक्शन वापरताय? तर या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात

Chanakya Niti : 'अशा' लोकांना घरात पाऊलही ठेवू देऊ नका, अन्यथा सुखाचा होईल कचरा

Mumbai : मुंबईतील सरकारी हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा संशयास्पद मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update : नागपूरमध्ये मेट्रोचा गर्डर तुटून अपघात

Gold Price Today : सोन्याचे दर पुन्हा घसरले, प्रति तोळा इतकी किंमत; वाचा 24k, 22k, 18k गोल्ड रेट

SCROLL FOR NEXT