Medha Kulkarni addressing media after halting Garba event in Pune’s Kothrud area. Saam Tv
Video

"धार्मिकतेचे विचित्र रूप" पुण्यातील गरब्याचा कार्यक्रम का बंद पाडला? मेधा कुलकर्णींचं स्पष्टीकरण|VIDEO

Garba Celebration in Pune Shut Down: पुण्यातील कोथरूडमध्ये आयोजित गरब्याचा कार्यक्रम भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे बंद पाडला.

Omkar Sonawane

नवरात्रीच्या निमित्ताने पुण्यातील अनेक ग्राउंड आणि लॉन्स वर गरब्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. अशाच एका कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे राज्यसभेच्या भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट कार्यक्रम बंद पाडला. पुण्यातील कोथरूड परिसरातील जीत ग्राउंड वर आयोजित केलेल्या गरब्याचा कार्यक्रम आवाजाची मर्यादा ओलांडत असल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला आहे. तसेच परिसरात राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना आणि काही रुग्णांना या आवाजाचा प्रचंड त्रास होत आल्याच्या तक्रारींचा मेसेज सुद्धा मेधा कुलकर्णी यांनी वाचून दाखवला. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला ते महापालिकेचे ग्राउंड नसताना सुद्धा इथे परवानगी कशी दिली असा प्रश्न सुद्धा त्यांनी उपस्थित केला. सण सोडून त्या ठिकाणच्या नागरिकांना घर सोडून जावं लागतं हे तर अजून वाईट आहे अशी प्रतिक्रिया मेधा कुलकर्णी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mystery : बिबट्याचा हल्ला की घातपात? कोल्हापुरात रहस्यमय मृत्यू, कंक दांपत्याच्या मृत्यूमागे गुढ वाढले, नेमकं प्रकरण काय?

Pancreatic Cancer Symptoms: पायांमध्ये 'हे' बदल दिसले तर समजा स्वादुपिंडाचा कॅन्सर झालाय; लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Rashmika Mandanna : "मेरी जान"; रश्मिकाला पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली

Maharashtra Live News Update : उल्हासनगरमध्ये ऑफिस खुर्ची बनवणाऱ्या कारखान्याला मध्यरात्री भीषण आग

Morning Motivation : सकाळी स्वत:ला या ५ सवयी लावा, आयुष्यात खुप पुढे जाल

SCROLL FOR NEXT