Pune Flood Saam TV
Video

Pune Flood : पुण्यात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती, नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ | VIDEO

Mutha River Flooding Pune : पुण्याच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे धरण क्षेत्रात मध्यरात्री जोरदार वसामुळे पुणे शहरातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. परिणामी मुठा नदीकाठच्या भागांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसामुळे काही भागांत रात्रीच पाणी घरांमध्ये आणि सोसायट्यांमध्ये शिरले आहे. शहरातील काही रस्ते पूर्णतः जलमय झाले असून, अनेक वाहने पाण्यात अडकली आहेत. काही वाहनं पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना वाहतूक आणि दैनंदिन कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना नदीकाठच्या परिसरात अनावश्यक फिरण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही तास हवामान विभागाने अधिक पावसाचा इशारा दिल्याने सतर्कतेचे वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा! मुंबई पुण्यासह कोकणात आज 'रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

Chia Seeds vs Saunf Water: चिया सीड्स की बडीशेपचे पाणी; वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट?

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकार्‍यांचे अधिकार बदलले

Maharashtra News Live Update: मुंबईसह पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

शाळेबाहेर 'स्टिंग' विकण्यास बंदी, अन्न-औषध प्रशासन मंत्र्यांची विधानसभेत घोषणा

SCROLL FOR NEXT