Pune Rain Saam TV
Video

Pune : पुण्यातील भिडे पुल पाण्याखाली, नागरिकांना सतर्कतेचा इशारा|VIDEO

Mula-Mutha River May Overflow : धरण प्रशासनाने मुळा-मुठा नदीमध्ये २ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.जोरदार पावसामुळे भिडे पुलावरही पाणी साचल्याचे दिसून आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे शहरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे खडकवासला धरणातील जलसाठा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने मुळा-मुठा नदीमध्ये २ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पाण्यामुळे नदीकाठच्या भागांमध्ये पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे आणि नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे इथल्या भिडे पुलावरही पाणी साचल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या परिसरातील वाहतूकीवर परिणाम झाला असून, नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हवामान विभागाने पुढील काही तास जोरदार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer: शेतकरी दुष्काळाने त्रस्त, कृषिमंत्र्यांसमोर अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त; संतापजनक VIDEO समोर

खासगी बसला ST ची दमदार टक्कर! 200 व्होल्वो बसेस, ऑनलाइन बुकिंग अन् शयनयानाची सुविधा

Maharashtra News Live Update: धुळ्यातील देवपूर प्रभात नगरमध्ये घरफोडी

Skin Care: चेहऱ्यावरचे खडे कमी होऊन स्किन होईल स्मूद आणि ग्लोईंग, घरच्या घरी करा 'हा' सोपा उपाय

Political News: माजी मंत्र्यांची मुलगी निवडणुकीच्या रिंगणात, शिक्षक मंतदार संघ निवडणुकीत मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT