Pune heavy rain Saam TV News
Video

Pune Rain : पुण्यात मुसळधार पाऊस, चक्क रस्त्यांना नद्याचे स्वरूप; व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

Pune heavy rain : पुण्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. रस्त्यावर पाणीच पाणी साचले असून पुणे-सातारा महामार्गासह अनेक भाग जलमय झाले. काही ठिकाणी घरातही पाणी शिरले.

Namdeo Kumbhar

वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने पुणेकरांची फजिती केली. दुपारी चारनंतर पुण्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. तासभरात पुण्यातील रस्त्यावर पाणीच पाणी झाले. जणू पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप मिळाले होते. पुणे सातारा रस्त्याला पावसाच्या पाण्याने नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. काही ठिकाणी तर पावसामुळे फ्लेक्स कोसळले. घरात पाणी शिरले. मागील चार दिवसांपासून पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे.

पुणे सातारा महामार्ग केळवडे ता. भोर येथे रस्त्यावर येणारे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याने महामार्गा चा अक्षरशः ओढा झाला. दुपारी चार वाजता सुरू झालेल्या पावसाने पुण्यात पाणीच पाणी केले. खडकवासला जवळील कोंढवे धावडे एनडीए उत्तमनगर परिसरात पावसाने झोडपून काढले. पिरंगुट , लवळे परिसरात वादळी वारा , ढगांचा गडगडाट आणि विजांचा चमचमाटसह तासभरांपासून पावसाने हजेरी लावली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update:बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्या ब्लॅकलिस्ट करणार

अमरावतीत भरदिवसा थरार! तरुणाची निर्घृण हत्या, हाताचा पंजाच छाटल्याने उडाली खळबळ

किडनी खराब होऊ नये म्हणून दिवसभरात किती पाणी प्यावे?

Gold Rate Today: सोन्याला चकाकी! १० तोळा ७,७०० रुपयांनी वाढले; 18K- 22K आणि 24K चे आजचे दर वाचा

Ratnagiri : रत्नागिरीत भयंकर घडलं! सकाळी झोपेतून लवकर उठवल्याने सुनेची सटकली, सासूच्या डोक्यात फळी घातली नंतर...

SCROLL FOR NEXT